Department
Latest News

  • विविध इंजिनिअरिंग कोर्सेसची व आयटीआय प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन सुरू. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या तीन कोर्सला प्रथम व द्वितीय वर्षात प्रवेश प्रक्रिया सुरू .

  • के.पी.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्नीक) कॉलेजला सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून करण्यात आलेल्या शैक्षणिक मूल्यमापनात राज्य शासनाचा 'ए' ग्रेड दर्जा देण्यात आला.

  • NOT APPLIED FOR ACCREDITATION BY NBA
Admission Open for Frist Year and Direct Second Year for Diploma Course.Covid-19 Helpline


के.पी पाटील पॉलिटेक्निकच्या ३७ विद्यार्थ्यांची नामांकित मल्टिनॅशनल कंपनींमध्ये निवड


के.पी पाटील पॉलिटेक्निकच्या ३७ विद्यार्थ्यांची निवड  बॉश प्रा.ली. चाकण पुणे व डेल्फी प्रा.लि. चाकण पुणे या नामांकित मल्टिनॅशनल कंपनींमध्ये के.पी.पाटील पॉलिटेक्निक कॉलेजच्या विध्यार्थ्यांचा थेट कॅम्पस इन्टरव्ह्यु पार पडला यामध्ये कॉलेजचे अनुक्रमे ३१ व ६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यांना बॉश कंपनीतर्फे वार्षिक २ लाख रुपयाचे पकेज ट्रेनिंग कालावधीत मिळणार आहे. तर डेल्फी कंपनीतर्फे वार्षिक १६८०००  रुपयांचे पकेज ट्रेनिंग कालावधीत मिळणार आहे. या प्रसंगी कंपनीचे एच आर प्रतिनिधी श्री मोहन पाटील व रवी पाटील यांनी मुलाखती घेतल्या. या बॉश कंपनीसाठी मेकॅनिकल चे व डेल्फी कंपनी साठी इलेक्ट्रिकल  या विभागाचे उत्तीर्ण विद्यार्थी पात्र होते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विविध पदांवर काम करण्याची सुवर्ण संधी कंपनीमार्फत दिली जाणार आहे. यासाठी टीपीओ प्रमुख एम एम आळवेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील, उपाध्यक्ष एस एस पाटील, सचिव विकास भैय्या पाटील, खजिनदार रणजितसिंह पाटील, प्राचार्य एस पी मोरे आदींनी शुभेच्या दिल्या.   फोटो वर्णन :- निवड झालेल्या विद्यार्थासमवेत बॉशकंपनीचे एच आर प्रतिनिधी मोहन पाटील व रवी पाटील एम एम आळवेकर